Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्याप पावसाची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्याप पावसाची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणतील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पावसाची शक्यता?

अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून(शुक्रवारी ता.१२) पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 3-4 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट दिला आहे.

पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १२ ते १४ जुलै दरम्यान या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. हा इशारा १४ जुलैपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT