Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Latest Rain Update| आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

Chinmay Jagtap

Maharashtra Rain News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जारदार बरसत असलेल्या पावसाने २ दिवस विश्रांती घेतल्याचे पहायला मिळत आहे. यातच आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

काकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 दिवस मराठवाड्यात आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अंदाजानुसार, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरातही अतिवृष्टीची शक्यता आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे आज विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसू शकतो. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT