Maharashtra Winter Session 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतांनाच सभागृहाची बत्तीगुल! रोहित पवारांनी काढले वाभाडे

संतोष कानडे

नागपूरः राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. नेमकं ऊर्जामंत्री बोलत असतांना बत्तीगुल झाल्याचा अनुभव सभागृहाला आला. वीजेच्या समस्येमुळे तब्बल ५० मिनिटं सभागृहाचं कामकाज तहकूल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी यासंर्भातील ट्विट केलं आहे. ''वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं.. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?''

असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

विधानसभेत आज युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते शंभुराज देसाई यांच्यात हल्ला प्रतिहल्ला झाला. त्यात अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुलाबराव पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई-पुणे रस्त्यावरील लाईटची समस्या मांडली. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एक रस्ता असा आहे जिथे ४० लोक रात्री आणि दिवसा पळून गेले. तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत आहे. त्या रस्त्याचा दर्जा सरकारने चेक करावा, तो रस्ता बनला की, त्यावरून धावता येईल आणि गुवाहाटीला जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT