महाराष्ट्र

महाराष्ट्रीय गोयल ‘सत्तासंकल्पा’साठी सज्ज

मृणालिनी नानिवडेकर

अर्थसंकल्प 2019 मुंबई - अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. १ फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले पीयूष गोयल यांच्यावर दिली गेली आहे. 

मोदी सरकारमध्ये गोयल यांच्यावर सातत्याने महत्त्वपूर्ण कामे सापवली गेली. ऊर्जा राज्यमंत्री या नात्याने सौरऊर्जेला प्रोत्साहन देणारी त्यांनी राबविलेली मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसेचा विषय ठरली. यानंतर रेल्वे खाते अन जेटली आजारी असताना थेट अर्थखात्याच्या हंगामी प्रमुखपदाची जबाबदारी गोयल यांच्यावर आली. प्रकृती अस्वस्थ असली, तरी अरुण जेटलीच मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करतील, असे मानले जात होते. पण, ते शक्‍य होणार नसल्याने पीयूष गोयल यांची निवड झाली. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी गोयल सज्ज आहेत. 

पीयूष गोयल याचे वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे जनसंघाच्या काळापासूनचे खजिनदार व राज्यसभेचे सदस्य होते.  वेदजींच्या पत्नी आणि पीयूष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यादेखील आमदार होत्या. राजकारणाचे बाळकडू मिळालेले गोयल चार्टर्ड अकांउंटन्सीची अवघड परीक्षा ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. जगातल्या हार्वर्ड, ऑक्‍सफर्ड अशा बड्या विद्यापीठात त्यांनी अर्थव्यवस्थापनाचे धडे घेतले.

केवळ काही लाखांची गुंतवणूक असलेली त्यांची अन त्यांच्या पत्नी सीमा यांची कंपनी कोट्यवधींचा नफा केवळ दहा वर्षांत दाखवू लागली. हा निधी कुठून आला यावरचे उत्तर होते सल्लागार शुल्क. कंपनीतून प्रचंड नफा मिळवणारे गोयल आता देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ऊर्जाक्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांचा पेनसिल्वेनिया विद्यापीठाने त्यांचा कॉर्नेट पुरस्काराने गौरव केला आहे.

महाराष्ट्राला मान
मुंबई परिसरातून राजकारण करणाऱ्या मोरारजीभाई देसाई यांच्या नावावर आजवर सर्वाधिक १७ वेळा  देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. चिंतामणराव उर्फ सी. डी. देशमुख सर्वांत गाजलेले अर्थमंत्री. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, समाजवादी नेते मधू दंडवते यांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवला आहे. अमराठी पीयूष गोयल अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणारे महाराष्ट्रातले सहावे नेते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT