Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: महात्मा गांधी ओबीसी असल्यानं त्यांची हत्या; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

महात्मा गांधी बनिया म्हणजे ओबीसी होते. यांना ओबीसी माणूस मोठा झाल्याचं पाहावलं नाही. त्यामुळे जातिवादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Sandip Kapde

Jitendra Awhad: महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर तीनेवेळा हल्ले झाले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. महात्मा गांधी बनिया म्हणजे ओबीसी होते. यांना ओबीसी माणूस मोठा झाल्याचं पाहावलं नाही. त्यामुळे जातिवादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

गांधींजींची हत्या ही १९४८ साली नाही झाली. त्यांच्यावर पहिला हल्ला १९३५ साली झाला. दुसरा हल्ला १९३८ साली झाला. तिसरा हल्ला १९४२ साली झाला. हे हल्ले का केले? तेव्हा तर पाकिस्तानची निर्मीती नव्हती, ५५ कोटींचा प्रश्न नव्हता. तेव्हा तर संविधानाचा प्रश्न नव्हता कारण यांना महात्मा गांधीजी नको होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गांधीजी बनीया होते आणि ते यांना नको होते. एवढ्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे. हे त्यांना मान्य नव्हत. गांधीजींच्या हत्येचे खरं कारण जातिवाद होता, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.  

जितेंद्र आव्हाड चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, बावनकुळे यांना प्रश आहे की ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तूम्ही काय चाकावर बसला होता? शाहू महाराज हत्या करण्याचा कूणी कट रचला होता? आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कुणी केला हे पाहायला हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दीले. 

काल ट्रकवाल्यांनी विरोध केला तर हे घाबरले आणि निर्णय मागे घेतला. तुम्ही रस्त्यावर उतरून विरोध करायला का घाबरत आहात? जनतेच्या मनात जायचं असेल तर तुम्हाला तुम्ही शरद पवार यांच्यासोबत आहात हे तुम्हाला दाखवायला हवं, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT