Raj Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रस्ताव; युतीबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : येत्या काही दिवसांत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. यामध्ये मनसेची (MNS) भाजपसोबत (BJP) युती होणार असल्याच्या चर्चा आहेत. मनसेची युती नेमकी कोणासोबत होणार? याबाबत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अद्यापही उत्तर दिलेलं नाही. मात्र, युतीसाठी कोणाकडून प्रस्ताव आलाय? याबाबत राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. ते पुण्यात (Raj Thackeray Pune Visit) बोलत होते.

मनसेची युती कोणासोबत?-

मनसेची युती कोणासोबत होणार? याबाबत आम्ही अद्याप काही निर्णय घेतला नाही. निर्णय झाल्यावर तुम्हाला कळवू. पण, सध्या युतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रस्ताव आला आहे. पण, कोणासोबत जायचं याचा निर्णय़ अजून घेतलेला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

भाजपच्या नेत्यालाही विरोध करा -

सध्या राज ठाकरे आणि भाजपची जवळीकता दिसतेय. पण, पुण्यात त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांना देखील विरोध करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. काम होत नसेल तर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करा. स्थानिक नगरसेवकांची प्रकरणे बाहेर काढा. मग तो भाजपचा नगरसेवक असेल तरीही विरोध करा, असे राज ठाकरे म्हणाले.

कोंढव्यात शाळेचं उद्घाटन -

शिक्षण मंडळाच्या कार्यातून ही वास्तू उभी राहिली. आम्ही आजपर्यंत फक्त भूमिपूजनाच्या पाट्या पाहिल्या. त्यानंतर काम होत नाही. पण, आमचे नगरसेवक असं करत नाहीत. आमचे नगरसेवक जिकडे निवडून आलेत त्यांनी उत्तम काम केलंय. जी आश्वासने दिली ती त्यांनी पाळली. आमच्यावेळी अशा ई-लर्निंग शाळा वगैरे नव्हत्या. आम्ही लर्निंगलाच ईSSS म्हणायचो, असं कोंढव्यातील ई-लर्निंग शाळेचं उद्घाटन करताना राज ठाकरे म्हणाले.

आमच्यावेळी कोरोना कुठं होता? -

कोरोनामुळे सर्व विस्कळीत झालं आहे. दहावीचे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले. आमच्यावेळी हा कोरोना होता कुठं? माझे दहावीचे गुण कळले तर तुम्हाला कमालच वाटेल. मुलं शाळेत खेळताना चांगले दिसतात. यांना अक्षरांची ओळख हाताने लिहून होणार आहे की नाही? अशी चिंता देखील राज ठाकरेंनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT