Jayashree Jadhav esakal
महाराष्ट्र बातम्या

माझ्या विजयाचं खरं श्रेय 'या' लोकांना देणार : जयश्री जाधव

सकाळ डिजिटल टीम

'कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलंय.'

काॅंग्रसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly By-election) जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम (Satyajit Kadam), तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आलीय. सध्या काही फेऱ्यांचे कल हाती आले असून यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतल्याचं कळतंय, तर भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर जयश्री जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधलाय. जयश्री जाधव म्हणाल्या, 'कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलंय. त्यामुळं आमचा विजय निश्चित होणार आहे. भाजपला (BJP) कोल्हापूरच्या मतदारांनी नाकारलं असून त्यांचा पराभव होणार आहे. आण्णांच्या माघारी, आपली जबाबदारी कोल्हापूरकरांनी चोख पार पाडली आहे. त्यामुळं आण्णांनी जे पेरलं, ते खरंच चांगलं उगवलंय.'

जाधव पुढं म्हणाल्या, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र आली, याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय मी महाविकास आघाडीसोबतच मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला देणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी निकालाआधीच व्यक्त केला. जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केलीय. निवडणुकीत चंद्रकांतदादांनी मन मोठं दाखवायला हवं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT