Nitin Raut Disappointed on Mahavikas Aghadi government e sakal
महाराष्ट्र बातम्या

ऊर्जामंत्री नाराज, राज्य सरकार मदत करत नसल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वीजेच्या मुद्द्यावरून राज्यसरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांच्यामध्ये आलबेल नसल्याचं दिसतंय. त्यांनी राज्य सरकारबाबत (Maharashtra Government) तशी नाराजी बोलून दाखवली आहे. कर्ज मिळत नाही आणि वसुली होत नाही. त्यातच राज्य सरकार आम्हाला मदत करत नाही, असा थेट आरोप नितीन राऊतांनी केला.

विजेची रात्री जास्त गरज असते. वीजेची मागणी वाढत आहे. पण, त्यासाठी पैसा लागणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा होऊनही ग्रामविकास आणि नगरविकास खात्याचा निधी आम्हाला प्राप्त झालं नाही. शेवटी नाईलाजानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत ही बाब पुढं नेणं आणि मोठ्या नेत्यांना कळवणे मला योग्य वाटलं, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली. त्यावेळी राज्यात अंधार पडू दिला नाही. अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटात मदत केली. वीज ही प्रत्येकाची गरज आहे. यामध्ये अडथळे येत असतील तर मोठ्या नेत्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे राज्याचा मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे. राज्य शासनाकडून पैसे मिळाले तर आम्हाला वीज जोडणी सुलभ करता येईल, असंही ऊर्जामंत्री म्हणाले.

काँग्रेस पक्ष म्हणून ऊर्जा खातं आमच्याकडे असलं तरी महाविकास आघाडीने एकत्र म्हणून काम करावं, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिली असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या बाबतील देखील मोठा निर्णय घेतला जाईल, असंही राऊतांनी सांगितलं. महावितरण आज फायद्यात नाही. पण, येत्या काही दिवसांत लाभ मिळविण्याचा फायदा करून देऊ, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT