Sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : सर्वेक्षणात मविआला महाराष्ट्रात भरघोस यश; पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांना...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये एनडीए सरकारच्या कामकाजाबाबत देशातील लोकांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. अर्थात भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. (Sharad Pawar news in Marathi)

शरद पवार म्हणाले की, सी व्होटर्सचा सर्व्हे मी पाहिला. त्यात असं दिसतं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. सर्व्हे करणाऱ्या संस्थेची सत्यता याआधीही स्पष्ट झालेली आहे. पण मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र या सर्व्हेने दिशा दाखवली असून ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही, असं दिसत, असल्याचंही पवार म्हणाले.

कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार राहणार नाही. पण उत्तर प्रदेश सर्वात मोठा भाग आहे. मात्र तेथील ठराविक माहिती आमच्याकडे नाही, असंही पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी विरोधकांच्या एक्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, सध्या प्रयत्न सुरू आहे. मात्र स्थानिक मुद्दे आहेत. केरळमध्ये डाव्यांसह राष्ट्रवादीचं सरकार आहे. तर काँग्रेस आमचा विरोधीपक्ष आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर आम्ही एकत्र येऊ इच्छितो, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT