LokSabhaElections #SudhirMungantiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल, पुन्हा ती उभीच राहणार नाही; मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडले की, पुन्हा उभी राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

सांगली : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Elections) इंडिया आघाडी (India Alliance) अशी पडेल की पुन्हा उभीच राहू शकणार नाही,’’ अशी टीका राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

महाविकास आघाडीचे नेते आणि ‘लांडगा आला रे आला’ म्हणणारा कथेतील ‘तो’ माणूस यांचा डीएनए एकच आहे. त्यामुळेच ते सारखे सरकार पडणार, असे म्हणतात, पण सरकार काही पडत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, ‘‘दर महिन्याला ते सरकार पडणार असे म्हणतात, मात्र अजून काही पडले नाही. आता १० जानेवारी म्हणत आहेत, मात्र १० जानेवारीनंतरही सरकार पडणार नाही. पुढे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडले की, पुन्हा उभी राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही.’’

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरून निशाणा साधताना मुनगंटीवार म्हणाले, ‘‘संजय राऊत हे अप्रत्यक्ष नरेंद्र मोदींना मदत करत आहेत. राहुल गांधींचे नाव घेतल्यावर भाजपलाच मतदान होतं, हे ममता बॅनर्जींना देखील कळलं आहे. त्यामुळे त्या राहुल गांधींच्या मागे गेल्या नाहीत.’’

एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात विजयाची विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘सुप्रिया सुळे आता दहा महिने मतदार संघातच थांबणार आहेत. कदाचित त्यांना धोका कळला असेल. त्यामुळे ‘जान बची तो लाखो पाए,’ अशी त्यांची अवस्था आहे. मतदार संघात काही गडबड झाली तर देशाचे नेतृत्व करता येणार नाही. यामुळे सुप्रिया सुळे मतदार संघात थांबणार आहेत. बारामतीची लोकसभेची निवडणूक खूप कमी अंतराने जिंकू.’’

वन पदभरतीबाबत ते म्हणाले, ‘‘वनसंरक्षक पद भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात वन विभाग जाईल आणि तेथे विनंती करू की ‘पेसा’ सोडून अन्य ठिकाणी भरतीला मान्यता द्यावी. कर्मचारी भरणे क्रमप्राप्त व अनिवार्य आहे.’’

‘अजितदादांचे ‘ते’आश्‍चर्यजनक नाही’

‘‘अजित पवारांनी गाड्या कुठून आणल्या मला काय माहिती? त्यांचा पक्ष वेगळा आहे. संघटन बांधणी, विस्तारासाठी गाड्या खरेदी करत असते. काँग्रेसनेही गाड्या दिल्या. अजितदादांनी २१ व्या शतकातील आश्‍चर्यजनक घटना केली का? निवडणूक आयोगाला ते खर्च देतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT