MVA Morcha  Sakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Morcha : फडणवीसजी Cool Down; तुमचा जळफळाट समजू शकतो म्हणत राष्ट्रवादीनं डिवचलं

राज्यापालांच्या या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

MahaVikas Aghadi Morcha : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महापुरूषांबद्दल वेळोवेळी करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून राजकारण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

राज्यापालांच्या या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले की, मविआचा आजचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा होता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली.

त्यानंतर आता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युउत्तर देत डिवचण्यात आले आहे. त्यामुळे आता हा वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यात मिटकरी म्हणतात की, देवेंद्रजी महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा एकंदरीत पॉवरफुल झालाय. त्याचा ड्रोन शॉट एकदा वेळेनुसार बघुन घ्याल. तुमचा जळफळाट आम्हीं समजु शकतो.cool down असे म्हणत मिटकरींनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी यामध्ये खुद्द फडणवीसांना टॅग केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या टीकेला फडणवीस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT