ramesh chennithala sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर

लोकसभेच्या जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकसभेच्या जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. आंबेडकरांच्या प्रवेशासाठी आमची काहीही हरकत नाही. पण अद्याप निवडणूक जाहीर झालेल्या नसल्याने महाविकास आघाडीत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झालेली नाही, असे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी सांगितले.

पुण्यात काँग्रेस भवन येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बैठक आज (ता.२३) आयोजित केली आहे. त्यापूर्वी चैन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

‘देशात महागाई, बेकारी सारख्या अनेक समस्या आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर चर्चा करत नाहीत. भाजपला देशात फक्त धार्मिक ध्रुवीकरण करण्यातच रस आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी श्रीरामांचा वापर सुरु केला याचे आम्हाला दुःख आहे.

काँग्रेसने नेहमीच सर्व जाती धर्मांना सोबत घेतले, पण सध्याची स्थिती पाहता धर्माच्या नावावर विभागणी सुरू करून देशातील महान परंपरा तोडली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही मंदिरात प्रवेश घेण्यापासून रोखले गेले. देव हा एका व्यक्तीचा नाही. अयोध्येतील कार्यक्रमात मोदींचे भाषण निवडणुकीसाठी होते, चैन्नीथला अशी टीका केली.

काँग्रेसचा कोणताही नेता भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, भाजप चर्चा घडवून आणून अफवा निर्माण करत आहे. हे तोडफोड करून स्थापन झालेले सरकार आहे, यास जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल, असा दावा चैन्नीथला यांनी केला.

लोकसभेचे नाव काढताच चव्हाणांनी जोडले हात

पत्रकार परिषदेमध्ये रमेश चेन्नीथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे सातारा किंवा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे असे विचारला. त्यावर चव्हाण यांनी लगेच हात जोडत मी लोकसभेसाठी इच्छुक नाही असे सांगितले. तर चैन्नीथला यांनी ‘पृथ्वीराज चव्हाण राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून उभे राहू शकतात’ असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT