Mahavikas Aghadi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi: मविआ विरुद्ध संजय राऊत! विरोधी पक्षच नाही मित्र पक्षसुद्धा म्हणतायत, "राऊत आता बास करा"

संजय राऊत यांच्यावर टीका करत तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोला आमच्या पक्षावर बोलू नका असा सल्लाही नेत्यांनी दिलाय

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने मविआतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र जयंत पाटील यांच्या एका व्यक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत?

संजय राऊत यांचं म्हणणं आहे त्यावर मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, आम्हाला महाविकास आघाडीची वज्रमुठ टिकवायची आहे. तर पत्रकार आहेत, संपादक आहेत. संजय राऊत यांनी वेगवेगळ्या बाजू समजून घेऊन ही वक्तव्य केली असतील असं जयंत पाटील म्हणालेत.

या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार, छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील टीका केली आहे तर जयंत पाटील यांनी आधीच आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील बोलताना म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडी आणि वज्रमुठ टिकवायची आहे. त्यामुळे मी या प्रकरणावर किंवा संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना उचित ठरणार नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. याधीही संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी संजय राऊत यांना आमच्या पक्षात चोमडेगिरी करू नका, तुमच्या पक्षात लक्ष द्या असं म्हंटलं होतं.

तर अजित पवारांनी राऊत यांनी राष्ट्रवादीची वकिली करू नये त्यांनी त्यांच्या पक्षावर बोलावं असं म्हंटलं तर छगन भुजबळ यांनी आज लिहलेल्या अग्रलेखावर बोलताना म्हंटलं की, संजय राऊत यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, अशा स्वरूपाचा आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील नेत्यांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनीही अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी टिकवायची आहे म्हणून मी राऊत यांच्यावर काही बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या अग्रलेखावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीतील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोला आमच्या पक्षावर बोलू नका असा सल्लाही या नेत्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT