Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : विधानसभेत ‘मविआ’ला २२५ जागा मिळतील;शरद पवार यांचा दावा; भाजपचे माजी आमदार भालेराव यांचा पक्षप्रवेश

‘‘राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने निवडून दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने निवडून दिले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही २८८ पैकी २२५ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष व खा. सुप्रिया सुळे, आ. राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश करणारे कार्यकर्ते उदगीर आणि देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार लोकांनी निवडून दिला होता. पण या दोन्ही उमेदवारांनी लोकांचा घात केला. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. ज्यांनी जनतेचा घात केला त्यांना धडा शिकवायचा या भावनेने आपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचे स्वागत करतो.’’

मराठी माणसांना सूर्याजी पिसाळांसारखी लोक आवडत नाहीत. गद्दारांना योग्य प्रायश्चित देण्याचे तुम्ही काम कराल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT