महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये शनिवारी महायुतीचा मेळावा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नेते आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महायुतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. राजकारणात कधीकधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, लोकसभेत मविआ म्हणतंय आमचा विजय झाला.. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकू शकलं. मात्र आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील.

फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत, ते खोटं बोलत होते मात्र आपणही गाफील राहिलो होतो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागणार आहे, सत्य चिरकाळ जिवंत राहतं..असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल, दुसरी नव्हे. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागली असून विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही? असा प्रश्न आहे.

''लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेल, लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत.'' असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

प्रवक्ते काय बोलताएत ते बघा- फडणवीस

''सर्वपक्षीयांना सांगतो की एकमेकांमध्ये विसंवाद आहे.. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. खुमखुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा.'' असं म्हणत त्यांनी वाचाळवीर प्रवक्त्यांना खडसावलं. यावेळी फडणवीसांनी अटल बिहारी वाजपेयी यांची 'कदम मिलाकर चलना होगा' या कवितेची आठवण उपस्थितांना करुन दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT