solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! गुळवंचीत वीजेचा शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू; ओढ्याच्या पाण्यातच पडली वीजेची तार

गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील २४ म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

वडाळा : गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यातील २४ म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळी वीज वितरणचे अधिकाऱ्यांनी धाव घेतली.

गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या २४ म्हशी होत्या. गुरुवारी (ता. ४) नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी भजनावळे गावाबाहेर जात होते. गावाजवळील ओढ्यात विजेची तार तुटून अगोदरच पडली होती. त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता. याचा अंदाज पशुपालक भजनावळे यांना आला नाही. त्यांना काही समजायच्या आत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या होत्या. भजनावळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांच्या चार म्हशींचा जीव वाचला आहे. या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली. आता महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीच्या निधीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT