smart meter rules sakal
महाराष्ट्र बातम्या

‘महावितरण’चा मोठा निर्णय! प्रत्येक ग्राहकास स्मार्ट मीटर बसवावेच लागणार, शंका असलेल्यांच्या घरात आता शेजारीच स्टॅण्डर्ड मीटरही बसविले जाणार, वाचा...

सोलापूर शहरात ‘महावितरण’चे दोन लाख ४७ हजार ग्राहक आहेत. त्या प्रत्येकास स्मार्ट मीटर बसवावेच लागणार आहे. वीजचोरी व वीज गळती रोखण्यासाठी ‘महावितरण’ने हे मीटर बंधनकारक केले आहे, पण सध्या बसविण्याची सक्ती नाही. अजूनही शहरातील एक लाख ५२ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविलेले नाही, त्या ग्राहकांची परिसरनिहाय यादी ‘महावितरण’कडून तयार केली जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात ‘महावितरण’चे दोन लाख ४७ हजार ग्राहक आहेत. त्या प्रत्येकास स्मार्ट मीटर बसवावेच लागणार आहे. वीजचोरी व वीज गळती रोखण्यासाठी ‘महावितरण’ने हे मीटर बंधनकारक केले आहे, पण सध्या बसविण्याची सक्ती नाही. अजूनही शहरातील एक लाख ५२ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविलेले नाही, त्या ग्राहकांची परिसरनिहाय यादी ‘महावितरण’कडून तयार केली जात आहे.

स्मार्ट मीटर आणि ‘टाईम ऑफ डे’ यंत्रणा बसविलेल्या ग्राहकांना दिवसा सकाळी ९ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या वीज वापरावर प्रतियुनिट ९० पैसे सवलत आहे. तरीपण, शहरातील ६५ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी ते मीटर अजूनही बसविलेले नाही. ते मीटर जास्त पळते, वीजबिल ज्यादा येते, अशा शंका ग्राहकांच्या मनात आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटरबद्दल शंका आहेत, त्यांच्या घरी स्मार्ट मीटरजवळच दुसरे स्टॅण्डर्ड मीटर ‘महावितरण’तर्फे बसवून दिले जाणार आहे. ग्राहकाची शंका दूर झाल्यावर ते स्टॅण्डर्ड मीटर काढून घेतले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगामी काळात याच स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना वीज वापरासाठी रिचार्ज करावा लागणार आहे. तो रिचार्ज संपला की वीजपुरवठा आपोआप बंद होणार आहे. पण, सध्यातरी तशी कार्यवाही सुरु झालेली नाही. दरम्यान, आता शहरातील ज्या ग्राहकांनी किंवा हौसिंग सोसायट्या, अपार्टमेंटमधील ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविलेले नाही, त्यांच्याशी महावितरण पत्रव्यवहार करणार आहे. त्यानंतर त्याठिकाणी स्मार्ट मीटर बसविले जातील, असेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

स्मार्ट मीटर बसवावेच लागणार

सोलापूर शहरातील प्रत्येक ग्राहकास वीजेचे स्मार्ट मीटर बसवावे लागणार आहे. एकूण दोन लाख ४७ हजार ग्राहकांपैकी ९५ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतले आहे. उर्वरित ग्राहकांची यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्या सर्वांना देखील स्मार्ट मीटर बसवावे लागणार आहे.

- विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर शहर

सोलापुरातील स्मार्ट मीटरची सद्य:स्थिती

  • एकूण ग्राहक

  • २.४७ लाख

  • मीटर बसविलेले ग्राहक

  • ९५,०००

  • मीटर न बसविलेले

  • १.५२ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT