Major update on Malegaon Mayor post as ISLAM Party begins talks with another political party amid municipal power discussions.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Malegaon Mayor Post Update: मालेगाव महापौर पदासाठी हालचालींना वेग; ‘ISLAM’ पार्टीची ‘या’ पक्षाशी सुरू चर्चा

Malegaon Mayor Post Latest Political Development: मालेगावमध्ये कोणत्याच पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळालेले नाही; महापौर कुणाचा होणार सर्वांनाच उत्सुकता

Mayur Ratnaparkhe

Malegaon ISLAM Party Municipal Politics : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत इस्लाम पार्टीने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र असे जरी स्वबळावरच आपल्या पार्टीचा महापौर करता येईल, इतक्या जागा त्यांना मिळालेल्या नाहीत. शिवाय, मालेगावमध्ये कोणत्याच पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मालेगावचा महापौर नेमका कोणत्या पक्षाचा असेल याची उत्सुकताच आहे.

मालेगाव महापालिकेची एकूण सदस्य संख्या ८४ आहे आणि बहुमातासाठी ४३ जागांची आवश्यकता आहे. अशावेळी आता सर्वाधिक ३५ जागा जिंकणाऱ्या इस्लाम पार्टीने महापौर पदासाठी एमआयएम पक्षाशी बोलणी सुरू केली आहे. या निवडणुकीत एमआयएम मालेगावात २१ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १८ जागा, समाजवादी पार्टीला पाच जागा, काँग्रेसला तीन जागा आणि भाजपला दोन जागा मिळालेल्या आहेत.

खरंतर मालेगाव महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकल्यानंतर इस्लाम पार्टी राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मुस्लिम बहुल शहरात नवीन पक्ष असणाऱ्या इस्लाम पार्टीने केवळ सर्वाधिक जागाच जिंकल्या नाहीत, तर ४१.७ टक्के मत देखील मिळवले आहेत. यामुळे शहरात महापौर इस्लाम पार्टीचाच होईल असे मानले जात आहे. मात्र तरीही यासाठी त्यांना कोणत्यातरी पक्षाशी युती करणे भाग आहे. अशावेळी आता त्यांनी एमआयएमशी बोलणी सुरू केली आहे. 

आशिफ शेख रशीद यांनी इस्लाम पक्षाची स्थापना केली. आसिफ शेख हे अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणूनही काम केलेले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांनी इस्लाम पक्षाची स्थापना केली. ते यापूर्वी काँग्रेस पक्षात सामील झाले होते. २०२१ मध्ये ते काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आसिफ शेख रशीद यांची राजकीय स्थिती मजबूत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spare Parts Price: आधी सोनं-चांदी उच्चांकी, आता वाहन खर्चही गगनाला भिडला; टायर्स आणि गाड्यांच्या सुटे भागांचे दर वाढले

Horoscope : आजपासून गुप्त नवरात्र सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; अचानक मिळतील पैसे, मिळेल मोठं सरप्राइज, इच्छापूर्ती योग

कलर्स मराठीकडून सुरज चव्हाणला 'BBM 6'चं आमंत्रण; रीलस्टार घरात जाणार? उत्तर देत म्हणाला- बोलावलंय तर...

U19 World Cup: १८ षटकार अन् २९ चौकार... दक्षिण आफ्रिकेच्या यंगिस्तानचा मोठा पराक्रम; स्पर्धेत गाठला नवा उच्चांक

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

SCROLL FOR NEXT