Talathi Bharti 
महाराष्ट्र बातम्या

Talathi Bharti: तलाठी भरती गैरप्रकाराबाबत फडणवीसांना आधीच सांगितलं होत, तरी आरोपी मोकाट कसा?; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

Sandip Kapde

Talathi Bharti: नाशिकमध्ये तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये फरार असल्याचे समोर आले आहे. गणेश घुसिंगे या आरोपीला तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

या परीक्षेदरम्यान गुरुवार (ता.१७) रोजी म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्रा बाहेरून आरोपीला वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल सह ताब्यात घेतले आहे.

२०२१ आणि २०२२ मध्ये देखील गणेशवर गुन्हे दाखल आहेत.  गणेश घुसिंगेने म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसात डिसेंबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर २०१९ मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस भरती प्रकरणात देखील त्याने गैरप्रकार केला होता. याप्रकरणी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी फरार असताना अटक करण्यासाठी एवढे दिवस का लागले, असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. (nashik latest news)

तलाठी भरतीबाबत आधीच सांगितलं होत. पेपरफुटीवर कडक कायदा करा, अशी मागणी समितीचे राहुल कवठेकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT