Uddhav-Thackeray-mamta sakal
महाराष्ट्र बातम्या

ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढल्या; उद्धव ठाकरेंकडून कौतुक

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई - इंग्रजांच्या काळासारखी आता परिस्थिती आली आहे. आणिबाणीला विरोध करणारे आता तसेच वागत आहे. आता गप्प बसलो तर पुन्हा गुलाम होऊ. हे रोखायचे असेल तर शिवसेना (Shivsena) मैदानात हवी, अशा शब्दात भाजपवर (BJP) हल्ला चढवत या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखविण्यासाठी लवकरच महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढणार, असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नमुद केले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपला सोडलं म्हणजे हिंदूत्व सोडलं नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, त्यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाच कातडं पांघरलंय. काही राज्यात गोवंश हत्या बंदी आणि दुसऱ्या राज्यात अशी बंदी नाही. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एकच सुत्र हवे. यांचे सुत्र सत्तेसाठी हिंदूत्व आहे. आपलं हिंदूत्वसाठी सत्ता हे सुत्र आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारले.

बाबरी पडल्यानंतर शिवसेनेला बाहेरील राज्यात जाण्याची संधी होती. पण देश त्यांच्यासाठी महाराष्ट्र आपल्यासाठी हे वचन दिले होते. त्यामुळे राज्याबाहेर गेलो नाही. पण आता पर राज्यातही निवडणुक लढणार असेही त्यांनी नमुद केले. आता गुलामगिरीसारखी परिस्थिती आहे. गप्प बसलो तर पुन्हा ब्रिटीश काळासारखी परीस्थीती येईल. त्यासाठी शिवसेना मैदानात हवी असेही त्यांनी नमुद केले.

भाजपने आमचा वापर केला

डिपॉझिट जप्त होणाऱा पक्ष आमच्या मुळे वाढला. त्यांनी आमचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी मी गेलो होता. मग आमचे चेहरे वापरले नाहीत का असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणुका एकट्याने लढण्याची आमची तयारी आहे. तुम्हीही एकट्याने लढा. मागून ते ईडी, इनकम टॅक्स आणू नका असा टोलाही त्यांनी लगावला.

मित्र असल्याचे दु:ख

आम्ही 25 वर्ष युतीत सडलो. संधी मिळाल्यावर आम्हालाही संपवायचा विचार होता.त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले.आम्ही शपथ दिवस उजाडण्यापुर्वी घेतली नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. हे आपलं मित्र होते याचं दुख आहे.ते स्वत:च्या काळीजीनेच संपणार आहे.लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.तेव्हा भगव्याचे तेज यांना दिसेल असेही ठाकरे यांनी नमुद केले.

ममता बॅनर्जी यांची कौतुक

तेव्हा सोबत असलेले पक्ष आता त्यांच्या बरोबर नाही. संघ मुक्त भारताची घोषणा करणारे,मो दींना विरोध करणारे पक्ष त्यांच्या सोबत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढल्या. आता पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही. आपणही वाघा आहोत तसेच लढले पाहिजे, अशा शब्दात बॅनर्जी यांचे कौतुक करत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्याचे आदेश दिले.

...तर शिवसेनेचा पंतप्रधान असता : उद्धव ठाकरे

शिवसेनेने संधी असताना राज्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही.तेव्हा इतर राज्यातील निवडणुका लढवल्या असत्या तर आज आपला पंतप्रधान असु शकला असता.पण,आता निवडणुका लढवणार असेही ठाकरे यांनी नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; रुग्णांना आर्थिक फटका

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT