Crime News
Crime News Esakal
महाराष्ट्र

Crime News: 'गुप्तचर विभागातील अधिकारी सांगून...' एनआयए कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA), मुंबई येथे तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून तिची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव आवळे (वय वर्षे ३१) असे आरोपीचे नाव असून तो मिरज, सांगली येथील रहिवासी आहे.

महिला कॉन्स्टेबलने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आवळे 2019 मध्ये तिला भेटला तेव्हा त्याने स्वतःची ओळख केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागातील अधिकारी म्हणून सांगितली आणि तिच्याशी चांगली मैत्री केली. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलशी लग्न करण्याच्या बहाण्याने आरोपीने जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर आरोपी आवळे याने तक्रारदार पोलिस महिलेकडून विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. आवळे यांनी तिला पोलिसांच्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले आणि काही मित्र आणि नातेवाईकांकडून तिच्या नावावर पैसे घेतले, असे तक्रारदार पोलिस महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

आरोपींनी तक्रारदाराला तिच्या बचतीतून पैसे काढून गुंतवणुक करण्याचे आमिष दिले. तिच्याकडून 13 तोळे सोनेही घेतले. आरोपीचा आपल्याशी लग्न करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पैसे परत करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

आरोपी तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. शेवटी, जेव्हा तक्रारदाराने त्याच्यावर दबाव आणला तेव्हा त्याने तिला पैसे परत करण्यास नकार दिला आणि परतफेड करण्यास भाग पाडल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर महिलेने काही आठवड्यांपूर्वी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. झोनल डीसीपीने त्याचा आढावा घेतला या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT