महाराष्ट्र बातम्या

राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या नियोजनासाठी समिती

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांसह ‘सीईटी’चे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी कुलगुरू व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रत्येक विद्यापीठाच्या किती परीक्षा झाल्या, किती शिल्लक आहेत, याचा आढावा सामंत यांनी घेतला.  

सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठ, महाविद्यालय आणि ‘सीईटी’ सेलने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्या रद्द होणार नाहीत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शैक्षणिक वर्ष किमान दीड महिना पुढे ढकलले जाणार आहे. नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी समिती स्थापन केली असून, यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांचा समितीत समावेश आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT