Anna-Hazare 
महाराष्ट्र बातम्या

Anna Hazare on Manipur: मणिपूरच्या 'त्या' भीषण घटनेवर अण्णा हजारेंचा संताप; म्हणाले, त्यांना...

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

राळेगणसिद्धी : मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हजारे म्हणाले, "मणिपूरच्या महिलांवर जे अन्याय अत्याचार झाले अशा नराधमांना फाशीवर लटकवायला पाहिजे. मी तर म्हणेन की या घटनेमध्ये याची गरज आहे.

स्त्री आपली आई आहे, बहिण आहे. विशेषतः जे देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असतात. अशा एका जवानाच्या पत्नीवर असा अन्याय-अत्याचार होतो, हे अजूनच गंभीर आहे. (Latest Marathi News)

मणिपूरमध्ये घडलेल्या या घटना म्हणजे मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रिजभूषण यांनी केलं भाष्य

दरम्यान, मणिपूरच्या या घटनेवर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिजभूषण म्हणाले, "स्वतंत्र भारतात ही खूपच दुःखद घटना घडली आहे. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून तुम्ही त्यांचं विधान ऐकलंच असेल. तरी देखील घटना घडली आहे, पण ती निंदनीय आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

तर काय ?

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

SCROLL FOR NEXT