Chitra Wagh 
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : महिला अत्याचारावरून होत असलेलं राजकारण चुकीचं; चित्रा वाघ यांची भूमिका

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच मणिपूरमधून धक्कादायक घटना समोर आली होती. यावरून संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली. आता महिला अत्याचाराच्या घटनेवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

चित्रा वाघ म्हणाल्या की, मी मणिपूरच्या घटनेचा निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. संसदेत चर्चेला सरकार तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. त्याचं कारण म्हणजे, राहुल गांधी हे संसदेत नाहीत. त्यामुळे याच राजकारण केलं जातं असल्याचा आरोप वाघ यांनी केला.

दरम्यान सगळ्यांनी मिळून अशा घटनांना विरोध केला पाहिजे आहे. शिवाय मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनांवर विरोधक बोलत नाहीत. मणिपूरवर बोललं जातं, पण माळदावर का बोललं जात नाही. माळदा पाकिस्तानात आहे का? ही विकृती आहे. ती पूर्णपणे ठेचली पाहिजे. एकूणच महिला अत्याचारावरून होत असलेलं राजकारण चुकीचं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

ज्यावेळी विरोधीपक्षात होतो, तेव्हा मी सांगितलं होतं की, भाजपचं सरकार आलं तरी या घटना लगेच बंद होणार नाही. अशा प्रकरणात सरकार कारवाई करत का? हे महत्त्वाचं असतं. गुन्हे होतात, आणि ते आटोक्यात आणण्याचं काम सरकर करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. मात्र अशा घटना होऊ नये यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT