Yashomati Thakur' and Atul Bhatkhalkar  
महाराष्ट्र बातम्या

Manipur Violence : अतुलदादा, तुझी बहिण, आई किंवा बायको असती तर...? यशोमती ठाकूर भातखळकरांवर भडकल्या

रवींद्र देशमुख

मुंबई - मणिपूमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला फटकारलं. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारे ट्विट केले. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर भातखळकर यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

यशोमती ठाकूर मणिपूरमधील घटनेवरून सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. यावेळी त्यांनी अतुल भातखरकर यांना सडेतोड प्रश्न विचारले. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अतुलदादा तुझी बहिण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का? दादा आहेस ना तू? अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा...काही सेन्सेविटी आहे की नाही? राजकारण करण्याच्या काही मर्यादा आहे की नाही? कशातही राजकारण करणार का, असे सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली होती. भातखळकर म्हणाले होते की, सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा...कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT