Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case esakal
महाराष्ट्र बातम्या

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

मनीषा यांनी वकिलामार्फत अर्ज देत त्या मुद्द्यावर तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच तपास केला असून दोषारोपपत्रात त्यासंदर्भात साडेतीनशे पाने आहेत. या मुद्द्यांच्या चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी घेतली होती, याची आठवण करून दिली होती. त्यानंतर आता आपण कोणताही अपहार केला नसल्याचे सांगत मनीषा यांनी आर्थिक बाबीची वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी रुग्णालयासह वळसंगकर कुटुंबीयांच्या बॅंक खात्याचे ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर आर्थिक अपहारासंदर्भात गुन्हा दाखल करावा, असा अर्ज डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसांना दिला आहे. त्यावर आता मनीषा यांनी ‘मी रुग्णालयात आर्थिक अपहार केला की नाही? यातील सत्यता बाहेर येण्यासाठी डॉ. शिरीष यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली आणि वळसंगकर हॉस्पिटलच्या बॅंक खात्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) व्हावे’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

डॉ. शिरीष यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याचे ठोस उत्तर अजूनही समोर आलेले नाही. या गुन्ह्यात सदर बझार पोलिसांनी ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यावर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामिनावर युक्तिवाद केला आणि तो ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने मनीषास जामीन मंजूर केला.

काही दिवसांनी डॉ. उमा वळसंगकर यांनी मनीषावर आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर मनीषा यांनी वकिलामार्फत अर्ज देत त्या मुद्द्यावर तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच तपास केला असून दोषारोपपत्रात त्यासंदर्भात साडेतीनशे पाने आहेत. या मुद्द्यांच्या चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी घेतली होती, याची आठवण करून दिली होती. त्यानंतर आता आपण कोणताही अपहार केला नसल्याचे सांगत मनीषा यांनी आर्थिक बाबीची वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी रुग्णालयासह वळसंगकर कुटुंबीयांच्या बॅंक खात्याचे ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे.

...तर वस्तुस्थिती समोर येईल

‘माझ्या बॅंक खात्याची किंवा आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, माझ्या खात्यात आलेली रक्कम कोठून आली याची पडताळणी करताना वळसंगकर हॉस्पिटलची बॅंक खाती, डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. उमा, डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याची कोणतीही चौकशी झालेली नाही. वस्तुस्थिती समोर येण्यासाठी हॉस्पिटलच्या हिशेबासाठी वापरले जाणारे ‘लाइफ लाइन मनोरमा’ हे स्वॉप्टवेअर, दैनंदिन आयपीडी फाइल्सचेही लेखापरीक्षण व्हावे’. जेणेकरून मी आर्थिक अपहार केला की नाही? हे स्पष्ट होईल, असे त्या अर्जात नमूद असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळा प्रकरणात स्थगिती देण्यास नकार

८० वर्षाच्या वृद्धाला हातपाय बांधून भरउन्हात गाडीत केलं लॉक, ताजमहल बघायला गेलं कुटुंब; VIDEO VIRAL

Video: लोकलमधील गुलाबी घागल्यातील तरूणीचा अप्रतिम डान्स पाहीलात का? व्हिडिओ तुफान व्हायरल

Astronomer कंपीनीच्या CEO चा HR हेडसोबत रोमँटिक व्हिडिओ व्हायरल... Elon Musk ची प्रतिक्रिया, काय असतं Kiss Cam Scandal?

Andy Byron : पती, पत्नी और वो! CodlPlay कॉन्सर्टच्या धक्कादायक व्हिडिओनंतर अँडी बायरन काय म्हणाला? जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी?

SCROLL FOR NEXT