महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: सर्व्हे करुन प्रगत ओबीसींना बाहेर काढा; जरांगे पाटलांनी सरकारपुढे ठेवल्या 'या' मागण्या

मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी गावात भव्य सभा पार पडत आहे. यावेळी त्यांनी समाजाशी संवाद साधला.

कार्तिक पुजारी

जालना- मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी गावात भव्य सभा पार पडत आहे. यावेळी त्यांनी समाजाशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.

१. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा

२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी

३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी

४. दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो सर्व्हे करण्यात आलेला नाही. असा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात

५. सरकारने मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण द्यावे

६. सारथीमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.

७. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं की, 'सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झालेत. आता १० दिवस सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे आता तात्काळ आरक्षण देण्यात यावे. चाळीस दिवसानंतर आरक्षण दिलं नाही तर काय ते तुम्हाला सांगू, मराठे अंगावर घेऊ नका. त्यांच्या विरोधात जाऊ नका.' (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

SCROLL FOR NEXT