Devendra Fadanvis  
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांना भाजपमधून काढा, अन्यथा ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया | Maratha Reservation

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fedanvis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज बाबत विधान केले होते. यावेळी त्यांनी पोलिसांची बाजू घेत नक्की मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला? याची माहिती दिली.

यावरून त्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, "फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी कित्येक जण करत आहेत. मात्र भाजपने त्यांना पक्षात ठेवूच नये, त्यांनी केलेले विधान हे मराठा विरोधी आहे."

"आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्हाला फडणवीस एक चांगली व्यक्ती वाटायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देवच वाटायचे. मात्र फडणवीस यांच्या मनात मराठा द्वेष असल्याचे आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपमध्येच कित्येक मराठा चेहरे नाराज आहेत. मी त्यांची नावे घेणार नाही. मात्र भाजपमधील मराठा चेहरे नाराज आहेत. ही वस्तुस्थिती आहे." असे यावेळी ते म्हणाले.

"गृहमंत्र्यांसारख्या उच्च दर्जाच्या व्यक्तीला असं बोलणं शोभत नाही. ते असं कसं बोलू शकतात ?आम्ही आमच्या जीवावर आंदोलन करतोय. कोणी गंगेत हात धुवत नाहीये. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी काही लोकं इथवर आले मात्र फडणवीस अजून आलेले नाहीयेत. त्यांना काढून टाका अन्यथा ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील ते आम्हाला मारतील." असे मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT