Manoj Jarange  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''आधी अळी वळवळ करत होती, आता जरांगे साहेब म्हणतंय'', जरांगेंची भुजबळांवर कडवी टीका

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाल्याचं पहायला मिळालं.

संतोष कानडे

बीडः बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करीत मराठा आरक्षणावर सडेतोड भाष्य केलं.

जरांगे बोलताना म्हणाले, कुणी म्हणतं आमचे घरं जाळले, कुणी म्हणतं आमचे हॉटेल जाळले. परंतु यांचे हॉटेल यांनीच जाळले आहे. काहीही झालं तरी बीड जिल्ह्यातला मराठा आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. निष्पाप मराठ्यांना गुंतवण्याचं काम सध्या सुरु आहे. मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं नसतं का? उलट मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

''येवल्याच्या येडपटाने त्याच्याच पाहुण्याचं हॉटेल जाळलं. ते बधीर आहे, सरकारही त्याचंच ऐकत आहे. बाजारची पिशवी घेऊन त्यात कागदं घेऊन फरत आहे. बघा.. बघा मला कशा शिव्या देतेत, म्हणत आहे. परंतु मी आधीच सांगत होतो माझ्या लादी लागू नको म्हणून. मी लई नमुना बेकारय. तुला आत्ताच खाल्लेलं पचत नाही.''

जरांगे पुढे म्हणाले, ''सध्या तो (छगन भुजबळ) बारीक बोलतोय, जसंकाय कळ निघती. जरांगे साहेब म्हणतोय आता. आधी अळी वळवळ करत होती. दिसतंयबी कसलंतरी.. रंग बदलणाऱ्यासारखं.''

''मला गिरीश महाजनांनी सांगितलं, तुम्ही बोलू नका. मी चार दिवस काही बोललो का? तरी काल बोललं. येडपट बुजगावणं. द्या सगळं त्यांना.. मंत्र्यांचे बंगले बांधा.. असं म्हणालं''

''नंतर बघून घेतो''

''एकदा आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करा. नंतर त्याला बघून घेतो. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जर कुणी बोलला तर त्याला सुट्टी नाही. मग तो कुणीही असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे.''

समाजाची गद्दारी करण्यासाठी मी आंदोलन उभं केलेलं नाही. माझ्यासाठी आधी समाज आहे आणि नंतर कुटुंब आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT