Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : इंदोरीकर महाराजांचा मराठा मोर्चाला पाठिंबा; कीर्तनाचे कार्यक्रम केले रद्द

राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. त्यानिमित्त त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा रद्द केलेले आहेत.

संतोष कानडे

मुंबईः राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. त्यानिमित्त त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा रद्द केलेले आहेत.

इंदोरीकर महाराज यांचं काम पाहणारे किरण महाराज यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चा काढला आहे.

जरांगे पाटलांचा मोर्चा गुरुवारी लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने निघाला. लोणावळ्यामध्ये सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालं होतं. परंतु ती चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान, सरकारचं आणखी एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांना विविध समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यातच राज्यातील नामवंत कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी पुढील तीन दिवसांचे कीर्तनाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहे.

दि. २६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत इंदोरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. मागील आंदोलनावेळीही इंदोरीकर महाराजांनी पाच दिवस कार्यक्रम बंद ठेवले होतं. 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र त्यांना त्यासाठी परवानगी मिळालेली नाही. जरांगे यांच्या आंदोलासाठी स्वतंत्र मैदान दिले जाईल, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येतंय. नेमकं आंदोलन कुठे होणार, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT