Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारकडून नवीन अध्यादेश; रात्रीतूनच जरांगेंसोबत होणार चर्चा

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलेलं असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलेलं असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठीचा नवीन अध्यादेश सरकारने तयार केलेला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी शुक्रवारी रात्री पार पडली. नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल, असंही सांगण्यात येतंय.

शुक्रवारी रात्री उशिरा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जाणार आहे. ही बैठक काही तास चालू शकते, असं सांगितलं जातंय. कारण मराठा आरक्षणाचे अभ्यासक, कायदेतज्ज्ञ यांच्याशी संबंधित अध्यादेशावर जरांगे पाटील चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

महत्त्वाचे म्हणजे जरांगे पाटलांनी सरकारला शनिवारी १२ वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. त्या अगोदर योग्य तो जीआर काढला नाही तर मोर्चा आझाद मैदानाकडे वळेल आणि पुन्हा उपोषण सुरु करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT