Manoj Jarange Maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''24 नव्हे 17 तारखेला मराठा आरक्षणाचा निर्णय सांगा, नंतर...'', मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला २४ तारखेपर्यंतचा वेळ दिला होता.

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला २४ तारखेपर्यंतचा वेळ दिला होता. परंतु त्यांनी आता १७ तारखेपूर्वीच सरकारने काय निर्णय घेणार, त्याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली, हे १७ तारखेच्या आत आम्हाला कळवा. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय, असा संशय येत आहे. १७ तारखेला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

पुढे बोलतना जरांगे म्हणाले, सत्तेतल्या तिन्ही पक्षांनी त्यांचे नेते आमच्याकडे पाठवले होते, त्यांचा पुढे काही संपर्क नाहीये. सध्या सरकार काय कार्यवाही करतंय, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. उपोषण सोडण्यावेळी सरकारचे प्रतिनिधी काय म्हणाले होते आणि त्यांनी लेखी आश्वासनं काय दिली होती, हे आम्ही जाहीर करणार आहोत.

''भुजबळांमुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात रोष निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भुजबळ यांचं ऐकून सरकार आमच्या गोरगरीब पोरांचं वाट्टोळ करत असेल तर ते चूक आहे. पूर्वी ४२ मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आता आणखी आत्महत्या झालेल्या आहेत.. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

याचदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांचीही पत्रकार परिषद झाली. भुजबळ म्हणाले की, जे मराठा आमदार जरांगेंच्या बाजूने बोलत आहेत त्यांना त्यांच्या मतांची काळजी आहे. काहीही झलं तरी मी ओबीसींसाठी लढत राहणार. मागील ३५ वर्षांपासून मी ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढत आहे आणि काहीही परिणाम भोगावे लागले तरी मी लढत राहणार, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.

दरम्यान, १७ तारखेला आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील धुरिणांची एक बैठक बोलावली आहे. याच बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मराठे मुंबईमध्ये आंदोलन करतील, अशी शक्यता मागच्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात आहे. परंतु या आंदोलनाचं स्वरुप कसं असेल, हे १७ तारखेला स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT