Manoj Jarange-Patil File Photo esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : 'आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले तेच आज...'; मनोज जरांगे पुन्हा गरजले!

रोहित कणसे

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन उभं करण्यात आलं. याआधी मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यभर फिरून मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान जागोजागी भव्य सभा घेतल्या जात असून ते जनतेशी संवाद साधत आहेत.  आज खराडी येथील सभेत देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यावर हल्लाबोल केल्याचे पाहयला मिळाले.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. मराठा समाज राज्य आणि देशासाठी लढत राहिला. मराठा माय-बापानं कधी जातीवाद केला नाही. सगळ्या जातीना आधार आणि पाठबळ देण्याचं काम माझ्या मराठा पिढ्यांनी केलं.

माझ्या डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणून समोर आला तर मराठ्यांच्या नजरेत माणूसकी जीवंत होत असे. कधीच त्यांनी जात शोधली नाही. हातात आहे ते मोठ्या मनाने देण्याचं काम मराठ्यांनी केलं . प्रत्येकाच्या सुखात-दुखःत मराठे धावून गेले. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे हे काळजीपूर्वक बघीतलं. दुसऱ्याचं लेकरू उघडं पडू दिलं नाही.

मराठ्यांनी सढळ हाताने इतरांना देत राहीले. आरक्षण देताना ही, कधीही भेदभाव केला नाही. कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही. गोरगरिबांच्या लेकरांचे कल्याण होत असेल तर अडवं पडायचं नाही ही मराठ्यांची प्रामाणिक भावना. स्वतःचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. तरीही मराठे कधीही तुम्ही घेऊ नका असे म्हणाले नाही.

जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही देताना कधी मागे पुढे पाहीले नाही. आज ही आमचा हात मदत करताना मागे घेत नाही. बापजाद्यांच्या संस्कारावर पाऊलावर पाऊल ठेऊन आमची वाटचाल सुरु आहे.

७५ वर्षात सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठ्यांनी केले. आज ही सर्व पक्षातील नेत्यांना मराठे मोठे करत आहेत. आरक्षणापायी मराठ्यांच्या घरातील लेकरु त्रास सहन करत आहे. पण ज्यांना मोठे केले ते मदतीला येत नाही. मराठ्यांची लेकरं नोकरीसाठी वनवन भटकत असताना कोणी मदतीला पुढे येत नाही. मराठा समाज्याची लेकरं टाहो फोडत आहे. कोणीतरी आमची हाक ऐका. पण कोणी त्यांच्याकडे पहायला तयार नाही. (Latest Marathi News)

आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले तेच आज आपल्या समोर आहेत. तेच म्हणतायेत मी तुम्हाला आरक्षण मिळु देणार नाही. मराठ्यांचे पुरावे असताना ही नाही म्हणून सांगितले जायचे. ज्या-ज्या समित्या झाल्या त्यांनी सांगितले पुरावे सापडत नाहीत. त्यावर आजपर्यंत मराठ्यांनी विश्वास ठेवला, ७५ वर्षांनी आज २०२३ मध्ये मराठा समाजाचे पुरावे सापडायला लागले आहेत.

त्यावेळी कोणते पुरावे घेतले नाहीत. नोंदी नाहीत. कागदपत्रं नाहीत. तरीही त्यांना आरक्षण दिलं गेलं. त्यावेळी व्यवसायावर आधारीत आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना आरक्षण का नाही.मंडल कमिशनने जी जात ओबीसी मध्ये घातली, त्याची पोटजात म्हणुन आणखी एक जात घातली. मग, मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? नितीन करीर यांना मराठा आरक्षणा संर्दभातील एका समितीचे अध्यक्ष केले. तीन महीन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा होता. पण करीर यांना माहीतच नव्हते ते समितीचे अध्यक्ष आहेत, असेही मनोज जरांगे यावेळी बोलतना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT