Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Praveen Darekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: "हे सर्व तेच घडवत आहेत," दरेकरांचे नाव घेत फडणवीसांवर जरांगेंचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: जरांगे पाटील यांच्या या टीकेला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. दरेकरांच्या या आरोपांना जरांगे पाटील यांनीही उत्तर देत पलटवार केला आहे.

आशुतोष मसगौंडे

मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती.

जरांगे पाटील यांच्या या टीकेला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. दरेकर म्हणाले होते की, ''जरांगे पाटील यांना पब्लिसिटी महत्वाची वाटत आहे. सर्व सामान्य महिलांना फायदा होत आहे त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजने ते आरोप करत आहेत.''

दरेकरांच्या (Praveen Darekar) या आरोपांना जरांगे पाटील यांनीही उत्तर देत पलटवार केला आहे. ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सर्व घडवत आहेत आणि दरेकांनाही तेच बोलायला लावत आहेत."

"दरेकरांच्या डोक्यात फक्त एकच भूत..."

प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करता जरांगे पाटील म्हणाले, "प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्ष आणि नेत्याला मोठे मानणास उतावळे आहेत. मला महिती आहे दरेकर मला कसं बदनाम करणार आहेत. तुम्हाला काय करायचेय ते करा, मी मरायला तयार आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस घडवत आहेत आणि दरेकरांनाही तेच बोलायला लावत आहे. दरेकरांच्या डोक्यात फक्त एकच भूत घुसले आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सत्ता."

"समाजाचे मारेकरी"

दरम्यान दरेकरांनी काल "मनोज जरांगे पाटील यांचा भंपकपणा दूर करण्यासाठी अभियान राबवणार," अशी घोषणा केली होती. यावर बोलताना जरांगे म्हणाले, "दरेकर आणि आणखी सात ते आठ जणांनी पडद्यामागून मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा संपवला. तुम्हा स्वताच्या स्वार्थासाठी जातीला संपवत आहात. त्यातील एक नंबरचे मारेकरी मला माहीत आहेत, तुम्ही दोन नंबरचे आहात. तुम्ही आणखी कशाकशाचे मारेकरी आहात आणि देवेंद्र फडणवीसांसाठी काय काय करता हे सर्व मला माहिती आहे."

"मराठ्यांची लोक फोडायला लागला"

यावेळी जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर मराठ्यांची लोकं फोडायला लागले आहेत असाही आरोप केला. ते म्हणाले, "दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष दाखवत त्यांना फोडायला लागले आहेत. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजेत. त्यांना फक्त आपली लेकरं महत्त्वाची आहेत. त्यामुळे भाजपमधील मराठ्यांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT