Manoj Jarange Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: सहाव्यांदा उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या मागण्या मान्य होणार का?; गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नांदेड : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं तसंच सगेसोयरेच्या विषयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. पण यावेळी त्यांच्या मागण्या मान्य होणार का? याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नांदेड इथं माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

महाजन म्हणाले, "मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करु शकतं, याबाहेर आम्ही काहीही करु शकत नाही. कारण कोर्टातही त्याला मान्यता देणार नाही. आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे की, मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जे तरुण विद्यार्थी, मुलं-मुली आहेत. त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे.

पण तो कसा द्यायचा, कुठल्या माध्यमातून द्यायचा, याचा निर्णय कायद्याच्या कसोटीत बसवूनच करायला लागेल ना? नाहीतर काहीही आम्ही निर्णय केला आणि तो कोर्टानं फेकून दिला तर करणार काय? मुख्यमंत्री याकडं लक्ष देत आहेत. सर्व शासन उपमुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत. नियमात बसणार १० टक्के आरक्षण आम्ही आधीच विधानसभेचं सत्र घेऊन त्यांना दिलेलं आहे," असं स्पष्टपणे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT