Maratha Andolan manoj jarange 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकादा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान आज (बुधवार) मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळ दाखल झाले आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या उपषोणाचा आज ९वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने. वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झालं आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पतळी कमी झाल्याने आज त्यांना सलाइन लावण्यात आले. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

यापूर्वी राज्य सरकाच्या शिष्ठमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, एक महिन्याचा वेळ द्यावा,असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. "तुम्ही म्हणाल ते करतो आधी अध्यादेश काढा. आम्ही ओबीसीमध्ये आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहली. ४ फेब्रुरवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. अजून ४ दिवस सरकारला देतो." असा अल्टीमेटम जरांगे यांनी राज्य सरकाला दिला आहे. दरम्यान सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणानंतर आज जरांगे यांची तब्येत खालावली असून जरांगे पाटील यांच्यावर उपचार केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT