Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा विधानसभेसाठी नेमका प्लॅन काय? इच्छुक उमेदवारांना अंतरवालीला बोलावले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे.

आशुतोष मसगौंडे

मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी पत्रकारांनी बोलताना जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून, सर्व समाजातील इच्छुक उमेदवारांना अंतरवाली सराटीला बोलावले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका भाजप आणि महायुतीला बसला आहे. त्यामुळे जर जरांगे यांनी उमेदवार दिले तर सर्वच राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीत पळापळ होणार हे नक्की.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, "१३ ते २० ऑगस्ट दरम्यान मी अंतरवाली सराटीमध्ये असणार आहे. आपल्याला निवडणुकीची तयारी करायची आहे. याकाळात प्रत्येक मतदासंघाबाबतची माहिती घेऊन या. आपल्याला सर्वच्या सर्व २८८ जागांची तयारी करायची आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या इच्छुकांनी तयारीने यावे."

ते पुढे म्हणाले, "जर सर्व समीकरण जुळले तर आपल्याला निवडणूक लढवता येईल. त्यामुळे बारा बलुतेदारांनी एकत्र येत सर्व जाती धर्मांच्या लोकांना निवडून आणायचे आहे."

महायुती, 'मविआ'ला टोला

जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाडीला जबरस्त टोला लगावला. ते म्हणाले, "आपण जर निवडणूक लढवली तर महायुतीचे लोक होतील आणि नाही लढवली नाही तर महाविकस आघाडीवाले खुश होतील. त्यांची स्टाईल बघा आघाडीवाले म्हणत आहेत ओबीसीबाबत बोलू नका. अशी शाळा सुरू आहे. दोन्ही आघाड्या आपल्याला वेड्यात काढत आहेत."

दरम्यान जरांगे पाटील गेल्या वेळी उपोषणाला बसले होते तेव्हा, राज्य सरकारने 13 जुलै रोजी सगे-सोयर अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन दिले होते. ही मुदत संपल्यानंतर मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

जालना येथील त्यांच्या गावी अंतरवली सराटी येथे जरांगे बेमुदत उपोषणास बसले आहेत. जरांगे 7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथून शांतता रॅली सुरू करणार असून 13 ऑगस्ट त्याचा शेवट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT