Manoj Jarange And Prasad Lad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: "आमदारकी देऊन मला मॅनेज करायचा प्रयत्न," राजकारणातील प्रवेशावर जरांगे पाटील काय काय म्हणाले?

Prasad Lad: गेल्या आठवड्यात प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना 'देवेंद्र द्वेष' झाल्याची टीका केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले होते.

आशुतोष मसगौंडे

मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांनी दिलेल्या आमदारकीच्या ऑफरचा समाचार घेतला.

गेल्या आठवड्यात प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना 'देवेंद्र द्वेष' झाल्याची टीका केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान काल प्रसाद लाड यांनी, "जरांगे पाटील यांना आमदार व्हायचे असेल तर मी राजीनामा देतो आणि माझ्या जागी त्यांना निवडून आणतो" असा प्रस्ताव दिला होता.

दरम्यान जारांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांची ऑफर धुडकावत मला राजकारण करायचे नाही असे म्हटले आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, "प्रसाद लाड यांनी सुपारी घेतली का? मला आमदारकी देऊन आंदोलनाची फोडाफोडी करायची आहे का? त्यांनी यातून राजकीय त्यांची राजकीय जात दाखवलीच. हे सुधारणार नाहीत."

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांना राजकारणात जायचे नसून, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

दरम्यान काल पुणे येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तयार आहेत का? असा प्रश्न केला होता.

याबाबत पत्रकारांनी जरांगे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, "हे महायुती आणि आघाडीवाले फक्त टोलवाटोलवी करत आहे. फडणवीसांनी आघाडीवाले काय करणार यापेक्षा ते यासाठी तयार आहेत का सांगावे. जर तयार असतील तर आम्ही समाज म्हणून त्यांच्या मागे उभारू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT