Manoj Jarange Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: आरक्षण मिळत नसले तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही; मनोज जरांगे पाटलांनी केले विधान

Maratha Reservation: आज सायंकाळी ते अंतरवाली सराटीहून (ता. अंबड) तुळजापूरला रवाना झाले.

सकाळ वृत्तसेवा

Vadi Godri: आरक्षणाच्या आडुन आम्हाला राजकारण करायचे नाही. सत्ताधारी, विरोधक मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एका वर्षापासून लढा सुरू असूनही आरक्षण मिळत नसले तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे हे शनिवारपासून (ता. ७) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. शनिवारी सोलापूरात शांतता संवाद फेरी असेल. त्यासाठी आज सायंकाळी ते अंतरवाली सराटीहून (ता. अंबड) तुळजापूरला रवाना झाले.

यावेळी बोलतांना ते हणाले, ‘आतापर्यंत ठिकठिकाणी काढलेल्या शांतता फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळा आहे. यापुढेही तो मिळेल. न्याय हक्कासाठी जनता आता घरात बसणार नाही’. भाजपा मराठवाडास्तरीय अभियान ( मिशन) राबवणार आहे, यावर टिका करताना जरांगे म्हणाले, ‘भाजपचे हे अभियान आरक्षण विरोधी आहे. आमदार निवडुन आणण्यासाठी ते आहे. त्यांनी शेतकरी, गरीबांच्या कल्याणासाठी अभियान राबवावे. त्यांचे सुरू झाले की आम्हीही अभियान राबवणार आहोत’.

काही मराठा आंदोलकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर जरांगे यांनी सांगितले की, ‘राज्यात सध्या आंदोलन सुरू नाही. ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणताही निरोप आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातुन अभियान राबवले जात आहे. मला घेरण्याचा, उघडे पाडण्याचा व बदनामी करण्‍याचा त्यातून प्रयत्न केले जात आहे. जनता हुशार आहे. हा डाव यशस्वी होणार नाही’.

उमेदवारीसाठी २० पर्यंत प्रस्ताव मागविणार

राज्यात गोर गरीबांची पहिल्यांदा लाट आली आहे. अंतरवाली सराटी येथे १४ ते २० ऑगस्टदरम्यान विधानसभेची आगामी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचे प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या प्रस्तावांवर २९ ऑगस्टला सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. या दिवशी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित राहाणार आहेत. या सर्वांसमक्ष निवडणुकीत उमेदवार द्यायचे किंवा कसे यासाबबत निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT