महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आंदोलनाची पुढची दिशा; म्हणाले...

रवींद्र देशमुख

जालना - मागील १७ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषण आज थांबलं आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस देऊन उपोषण थांबवलं. आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगेपाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासाठी स्वत: लक्ष घालणार आहे. मी आधीपासून सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देतील तर ते एकनाथ शिंदे आहे. तिच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून आहे. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे.

सरकारने एक महिन्यांचा कालावधी मागितला होता. सर्वांनी सांगितलं सरकार वेळ देऊन पाहा. समाजाकडून एकमताने सांगण्यात आलं, तेव्हा मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे देखील मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार यावर मी ठाम आहे. मला चिठ्ठी देण्यात आली. त्याची लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

जरांगा पाटील पुढं म्हणाले की, तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका. आमची आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ द्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह 'या' दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

SCROLL FOR NEXT