Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : "प्रचंड विश्वासघातकी माणूस..."; मनोज जरांगे पाटलांचं नक्कल करणाऱ्या भुजबळांना प्रत्यत्तर

भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर काल जोरदार टीका केली होती.

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल इंदापूर येथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे म्हणाले की, त्याला काय उत्तर द्यायचं, ते कुठंही बरळत आहेत. त्यांना आम्ही किंमत देत नाहीत. थोडा शहाणा माणूस असेल तर उत्तर देता येतं, तो कायद्याच्या पदापासून पूर्णपणे कामातून गेला आहे, त्याने लवकर गोळ्या सुरू कराव्यात.

जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रविण दरेकरांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवली सराटी गावात झालेल्या लाठीचार्जबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती, ती शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून व्यक्त केली होती ती त्यांची चुक होती असं वक्तव्य प्रविण देरेकर यांनी केलं. याबद्दलल जरांगे यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.

फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त करून चुक केली असं त्यांना म्हणायचं आहे का? प्रविण दरेकरांना देवेंद्र फडणवीसांनी असं म्हण म्हणून सांगितलं का? हे त्यांनीच सुरू करायला लावलं आहे. कारण हे त्यांच्या जवळचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे असं बोलत आहेत. मराठा समाजाशीच तुमचा सामना आहे.

देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार ते बघुयात. आहेत शांत तर शांत राहुद्या कशाला वातावरण ढवळत आहात, अशी देवेद्र फडणवीस यांना विनंती आहे. तुमच्या डोक्यातील विषारी विचार असतील तर मराठा नेत्यांच्या डोक्यात नका ओतू आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाजात कलह लावू नका. काय बरळायचं ते बरळा कारण पुढं सामना, मैदान सगळं सोबतच आहे असेही मनोज जरांगे म्हणाले.

छगन भुजबळ यांनी सभेत त्यांची नक्कल केल्याबद्दल विचारले असता जरांगे म्हणाले की, त्याला कोणी सांगावं, त्याला अजितदादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याला जातीवादाचे स्वप्न पडत आहेत. मराठा समाजानं पक्क ठरवलं आहे की, त्याने कितीही जातीवाद केला तरी ओबीसी आणि मराठा बांधव गावखेड्यात मित्र आहेत. सध्या लिंगायत, मुस्लीम, धनगर, दलीत बांधव मराठा समाजासोबत आहेत.

राजकीय स्वार्थासाठी लोक जमवून स्वार्थ साधून घेणार आहे, सोबतच्या ओबीसी नेत्याने आत्मपरिक्षण करावं. त्या माणसाचा मागचा इतिहास तपासावा या माणसाने प्रत्येक वेळी जातीवाद केला आहे आणि त्याला ज्यांनी मोठं केलं त्यांना पायाखाली चिरडलं आहे. त्याने सगळे पक्ष मोडले आहेत. प्रचंड विश्वासघातकी माणूस आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून गोरगरिब लोकांवर अन्याय होऊ देऊ नये असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT