Manoj Jarange_Ajay Barskar 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: "तुकाराम महाराजांबाबत सपशेल माफी पण बारस्कर हा भोंदू"; जरांगेंचा हल्लाबोल

हभप अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : हभप अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांगे हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जरांगेंनी संत तुकाराम महाराज यांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता मनोज जरांगेंनी उत्तरं दिली आहेत. तसेच बारस्कर यांचा उल्लेख भोंदू बाबा असा करत तो बावळट माणूस असल्याचंही जरांगेंनी म्हटलं आहे. (manoj jarange says sorry about tukaram maharaj but barskar is a hypocrite)

जरांगे बारस्करांवर भाष्य करताना म्हणाले, आमच्या आंदोलनात बारस्करसह मुख्यमंत्री शिंदेंचा एक प्रवक्ता यात आहे. यांचा ट्रॅप खूप दिवसांपूर्वीच आम्हाला कळाला आहे. पण आता तुकाराम महाराजांविषयीचा शब्द माझ्या तोंडून गेला म्हणून त्याला पकडून हे डाव साधायला लागलेत. कारण या दोन-चार जणांना काहीही मिळालं नाही. (Latest Maharashtra News)

मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीच्या त्याच्या प्रश्नांना मला उत्तरंच द्यायची आहेत. मी मराठ्यांच्या बाजूनं आहे, पण त्यांना जाळ टाकून बदनाम करायचं काम सुरु आहे.

मला असल्या चिल्लर लोकांवर बोलायचंच नाही, हे कसले महाराज आहेत. मराठ्यांचं नुकसान करणारा माणूसच मला नको आहे. जगद्तगुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आयुष्यातील सरळ पहिली माफी मागतो.

इतका मानतो मी त्यांना त्यांचा प्रसार करतोय मी. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या आहे हा, मी विनाशी नाही. संत तुकाराम महाराजांबाबत माझ्या तोंडून शब्द गेले असतील तर ते माझ्या नाराजीतून चिडचिडीतून गेले असतील. तुकाराम महाराजांबद्दल आपली सपशेल माघार आहे. (Marathi Tajya Batmya)

या माणसाला फेसबुक लाईव्हसाठीही कोणी विचारत नाही. त्याला आता मीडियाचे लोक विचारायला लागले आहेत, म्हणजेच हा ट्रॅप आहे. पण एकच लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करु नका. (Latest Marathi News)

तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळू दिलं नाही, म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करु नका, हे लक्षात ठेवा. हे पाप तुम्हाला भयंकर फेडावं लागेल. आम्हाला माहिती आहे हा सरकारचा ट्रॅप आहे, असे दहा बारा जण आहेत. मी त्याचवेळी सांगितलं होतं, त्यातला हा आता पहिला बाहेर आला आहे. बच्चू कडूंसोबत तो यायचा.

बारस्कर यांचा आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेवर मोठे आरोप केले आहेत. मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर यांनी केला आहे. यावेळी बोलताना बारस्कर म्हणाले, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत.

मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या, जरांगेंच्या बैठका रात्री होतात. लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही बारसकर यांनी केला आहे. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. मी प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाहीये. मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही. आताच हे का झालं? काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT