Manoj Jarange  
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंनी मागे घेतला शब्द

जरांगेंच्या आक्षेपार्ह विधानामुळं सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : "लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय" असं आक्षेपार्ह विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातील खऱाडी इथल्या सभेत केलं होतं. पण आता हे विधान अंगलट आल्यानं लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. (Manoj Jarange statement due to Maratha reservation rally expressed his apology)

राजकीय स्वार्थापोटी...

जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केला तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडं ओढलं. (Latest Marathi News)

....म्हणून शब्द मागे घेतो

माझं म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, कारण मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीयरंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतू आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काहीजणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

काय म्हणाले होते जरांगे?

पुण्यातील खराडी इथंल्या सभेत जरांगे म्हणाले होते की, "95 टक्के पडले तरी, मराठ्याचं लेकरु घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी मिळालं असतं तर, मराठा जात जगात एक नंबरवर राहिली असती. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळं आता सरकारला सुट्टी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT