Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; परंतु, सरकार 20 जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे.

सकाळ डिजिटल टीम

'सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम असून, त्यासाठीच आता मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.'

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; परंतु, सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे,’’ असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले. गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला.

शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगे यांनी आरक्षणासंदर्भात पुन्हा भूमिका मांडली. ‘‘लढा सुरू आहे. हे आंदोलन आता जनआंदोलन बनले आहे. त्यामुळेच ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र, सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम असून, त्यासाठीच आता मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असेही ते म्हणाले.

आंदोलनाचे आमचे टप्पे आधीच पडलेले आहेत. त्यामुळे २० जानेवारीला आम्ही निघणार म्हणजे निघणारच. एकदा अंतरवाली सराटी गाव सोडले, की आरक्षण आणल्याशिवाय मागे येणार नाही. भविष्यात मुलांचे हाल होऊ नयेत यासाठी सर्वांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

पालकमंत्री भुमरे यांनी घेतली भेट

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दुपारी रुग्णालयात येऊन मनोज जरांगे यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मराठवाड्यामध्ये पुन्हा शिंदे समिती आली पाहिजे, २०१७ मध्ये आयटीची परीक्षा देणाऱ्यांना नियुक्तिपत्रे दिली पाहिजेत आदी मागण्या जरांगे-पाटील यांनी भुमरे यांच्याकडे केल्या.

मार्गाविषयी आज माहिती देणार

अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी जाण्याचा मार्ग कसा असावा, यासाठी काही टीम नेमण्यात आल्या आहेत. त्या पाहणी करत आहेत. आम्ही मुंबईकडे पायी, ट्रॅक्टर, ट्रक तसेच जी काही वाहने मिळतील ती घेऊन निघणार आहोत. हा मार्ग कसा असेल, याविषयी गुरुवारी सांगणार असल्याचेही जरांगे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT