Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

''भुजबळांना आवरा! ओबीसींच्या अनेक पिढ्यांवर गुलाल टाकण्याचं काम मराठा समाजाने केलंय'' जरांगेंनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

वैजापूरः मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर दौरा काढला आहे. येत्या १४ ऑक्टोबर रोजी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे आंतरवाली येथे मराठा आरक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाट वरचेवर वाढतांना दिसून येतोय.

सोमवारी वैजापूर येथील सभेत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना इशारा दिला असून आमच्या अंगावर कार्यकर्ते सोडू नका, मराठा समाजाचा अवमान करु नका, असं म्हटलंय.

काय म्हणाले मनोज जरांगे?

छगन भुजबळ यांनी सत्तेचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या माध्यमातून वैजापुरातील काही मराठा बांधवांना नोटिसा बजावल्या, मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो भुजबळांना आवारा त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये, ओबीसी नेत्यांनी आरक्षण आंदोलनाचा अवमान होईल, असे बोलू नये. तुमच्या अनेक पिढ्यांवर गुलाल टाकण्याचे काम आमच्या समाजाने केले त्या समाजाचा अवमान करु नका, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

सकल मराठा समाजाच्या माध्यमातून वैजापूर पंचायत समितीसमोर सोमवारी (ता.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. जरांगे-पाटील म्हणाले, आर्थिक आणि सामाजिक निकषावर मराठ्यांचे मागासलेपण सिद्ध झाले. ओबीसींना व्यवसायाच्या आधारे आरक्षण मिळाले. मग मराठे तर शेती करतात. कुणबी म्हणून त्यांना आरक्षण द्यायला हवे, ही भूमिका मी सरकारपुढे मांडली.

सरकारने वेळ मागितला, त्यापेक्षा दहा दिवस जास्त दिले. १४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे राज्यातील शेकडो बांधव एकवटणार आहेत. या सभेला उपस्थित राहा, असे आवाहन त्यांनी वैजापूरात केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT