Manoj Jarange sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू ; ‘...तर विधानसभेच्या २८८ जागा लढविणार’

अंतरवाली सराटी (जि. जालना), ता. ८ : पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाचा चौथा टप्पा सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंतरवाली सराटी (जि. जालना) : पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाचा चौथा टप्पा सुरू केला आहे. ‘‘राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार,’’ असा इशारा मनोज जरांगे यांनी या वेळी दिला.

मनोज जरांगे हे चार जून रोजी उपोषण करणार होते. परंतु आचारसंहिता, निवडणूक निकाल, ग्रामस्थांची निवेदने या कारणाने पोलिसांनी जरांगे यांना परवानगी नाकारली होती, तसेच पोलिसांनी शनिवारी परवानगी नाकारली होती, तरीही उपोषण सुरू केले आहे. या वेळी मनोज जरांगे म्हणाले, ‘‘मी आरक्षणासाठी आठ महिन्यांपासून आंदोलन, उपोषण करत आहे.

सरकारने सगेसोयऱ्यांबद्दलच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, विविध संस्थांचे गॅझेट स्वीकारावे यांसह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलो आहे. शासनाने आरक्षण मंजूर करावे. राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार. उपोषण सुरू आहे तोपर्यंत सरकारने चर्चेसाठी यावे.

चर्चेची दारे उघडी आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाचा रोष पत्करू नये.’’ दरम्यान, अंतरवाली सराटी येथे ग्रामपंचायतीने बैठक घेऊन काही ठराव मंजूर केले. यात जरांगेंच्या उपोषणाला सहा सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी अंबडचे प्रभारी तहसीलदार धनश्री भालचिम, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. तर काल रात्री खासदार बंडू जाधव यांनी भेट दिली. प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT