Maharashtra Weather Update googel
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

यंदा मान्सून वेळेआधीच केराळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 'असनी' चक्रीवादळ निवळले असून त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या या पार्श्वभूमीवर केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलं आहे.

महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update Today) अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

दरम्याम, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनामुळे वेळेआधीच केरळमध्ये पावसाचा जोर कायम आहे. आज केरळातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मलप्पुरम, कोझिकोडे जिल्ह्यांना रविवारसाठी तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, कन्नूर या जिल्ह्यांना सोमवारसाठी हा इशारा देण्यात आला. आणीबाणीच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी पत्रकारांना सांगितले.

केरळमधील काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ प्रशासन अर्लट झाले असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT