CM Shinde Fadanvis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video : शिंदे-फडणवीसांची एकमेकांमध्येच स्पर्धा; दोन वॉररुमवरून मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

याबाबत 13 सप्टेंबर रोजी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Manisha Kayande Attack On Shinde Fadanvis : मंत्रालयामध्ये दोन वॉररुम स्थापन करण्यात आले आहेत. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच दोन वॉररुम म्हणजे शिंदे-फडणवीस एकमेकांमध्येच स्पर्धा करु पाहत आहेत का, असा प्रश्नदेखील कायंदे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत 13 सप्टेंबर रोजी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच छुपे मुख्यमंत्री आहेत का? असा सवालदेखील कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तर मविआ सरकारला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीन चाकी सरकार असं हिणवलं होतं. त्याचा समाचार घेत सध्याचं सरकार म्हणजे दोन चाकांचं स्कूटर सरकार असल्याची टीकादेखील कायंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वेगवेगळी वॉररुम का? या दोघांचीही एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस हेच छुपे मुख्यमंत्री आहेत की काय? असा प्रश्नदेखील कायंदे यांनी विचारला आहे. दरम्यान, मनिषा कायंदे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रत्तुत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT