exise department sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस अधीक्षकांकडील दत्तक मुळेगाव तांड्यावर ‘हातभट्टी’ दारु निर्मिती; 'राज्य उत्पादन शुल्क'चे छापे

ऑपरेशन परिवर्तनातून हातभट्टी दारु विक्री व निर्मितीत मोठी घट झाली. पण, आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होऊ लागली आहे. मुळेगाव तांड्यासह इतर ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची वस्तुस्थिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून स्पष्ट होते.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हाभरात अवैध हातभट्टीची दारू पुरवठा करणाऱ्या मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (ता. २४) सकाळच्या सत्रात छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रीत रसायन व इतर साहित्य, असा एकूण तीन लाख तीन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. २४) मुळेगाव तांड्यावरील अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर धाडी टाकल्या. त्यावेळी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार सात गुन्हे नोंदविले. या कारवाईत तब्बल १२ हजार ९०० लिटर गुळमिश्रित रसायन, लोखंडी भट्टी व प्लॅस्टिक बॅरल, असा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सदानंद मस्करे, निरीक्षक संभाजी फडतरे, निरीक्षक भरारी पथक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदणी येथील श्री. हजारे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान इस्माईल गोडिकट, वसंत राठोड, योगिराज तोग्गी, अनिल पांढरे, वाहन चालक रशीद शेख व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील एक-दीड वर्षांत तांड्यांवर छापे टाकून एक कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

‘मुळेगाव तांडा’ पोलिस अधीक्षकांकडे दत्तक

तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा अभ्यास करून तांड्यांवरील अवैधरीत्या तयार होणारी हातभट्टी व दारूची विक्री कायमची बंद व्हावी, या हेतूने ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले. त्याअंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांडे व गावे दत्तक दिली आणि त्याठिकाणी आठवड्यातून तीन-चार वेळा कारवाई करण्याचे आदेश दिले. अधीक्षक सातपुते यांनी स्वत:कडे मुळेागाव तांडा ठेवला. दिलासादायक बाब म्हणजे सहाशेपेक्षा अधिक लोकांनी तो व्यवसाय सोडून दिला. हातभट्टी दारु विक्री व निर्मितीत मोठी घट झाली. पण, आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होऊ लागली आहे. मुळेगाव तांड्यासह इतर ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची वस्तुस्थिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT