PhD Examination sakal
महाराष्ट्र बातम्या

‘पीएच.डी.’च्या कोर्सवर्कमध्ये एका गुणाने अनेकजण नापास! भावी संशोधकांची फोटोकॉपी अन्‌ पुनर्मूल्यांकनाची मागणी; विद्यापीठ प्रशासनाचे नियमांवर बोट

विद्यापीठाने पीएच.डी.च्या ७२१ विद्यार्थ्यांची कोर्सवर्क परीक्षा घेतली. त्यात ६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पण एक-दोन गुणाने नापास झालेल्या भावी संशोधकांनी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागितली आहे. मात्र, विद्यापीठाने नियमांवर बोट ठेवून त्यास नकार दिला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पीएच.डी.च्या ७२१ विद्यार्थ्यांची कोर्सवर्क परीक्षा घेतली. त्यात ६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे, पण एक-दोन गुणाने परीक्षेत नापास झालेल्या भावी संशोधकांनी विद्यापीठाकडे उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागितली आहे. मात्र, विद्यापीठाने नियमांवर बोट ठेवून फोटोकॉपी देण्यास नकार दिला आहे.

कोर्सवर्क परीक्षा दिलेल्यांपैकी काहीजण एक- दोन गुणांनी नापास झाले आहेत, त्यांनी प्रश्नपत्रिकांमधील दहा-दहा गुणांचे दोन प्रश्न चुकल्याची तक्रार केली आहे. त्याला सरसकट गुण द्यावी किंवा उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी तरी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, परीक्षा झाली निकाल लागला आणि आता प्रश्न चुकीचे आहेत म्हणणे असल्याचे विद्यापीठाचे मत आहे. दुसरीकडे फोटोकॉपी देण्याचीही तरतूद नियमात नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांच्या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या. तरीदेखील, मराठी प्रश्नपत्रिकेतील दोन प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यावर विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे. आता विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रिपीटर काही भावी संशोधकांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यांचे निकाल काही दिवसांत जाहीर होतील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

तीन महिन्यांत कोसवर्कची पुन्हा परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा घेतली. या परीक्षेत ६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. काही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची मागणी केली आहे, पण विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांत ती मागणी बसत नाही. आता आगामी तीन महिन्यांत कोसवर्कची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे, जेणेकरून संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा हेतू आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

तीन महिन्यांत पुन्हा कोर्सवर्क परीक्षा

अडीच वर्षानंतर विद्यापीठाने पीएच.डी. करणाऱ्या भावी संशोधकांची कोर्सवर्क परीक्षा घेतली. संशोधन अंतिम टप्प्यावर असलेल्या किंवा संशोधन कार्य पूर्ण झालेल्या संशोधकांना कोर्सवर्क परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच ते सादर करण्याची संधी होती. मात्र, कोर्सवर्क परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना आता पुढच्या कोर्सवर्क परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. साधारणत: मार्च २०२५ मध्ये कोर्सवर्क परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT